आदिवासींना आपलं मानणाऱ्या.डॉ. राणी बंग आकॉलेजीस आहेत;
पण खेड्या
भारतभरात हजारो मेडिकल डॉक्टर्स काही पोहोचत नाहीत. शहरी भागात गल्लोगल्ली डॉक्टर्स आहेत, त्यातले पाच दहा टक्केसुद्धा दुर्गम भागात पोहोचत नाहीत. आरोग्य यंत्रणा अशी कोलमडलेली असताना डॉ. राणी आणि अभय बंग यांच्यासारख्या फॉरेन रिटर्न्स डॉक्टर्सनी गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन काम सुरू केले. त्यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरते सीमित न राहता खेड्या-पाड्यात, देशा-परदेशात उपयुक्त ठरतंय, यातच या कामाचं यश आहे. राणी बंग यांना वैद्यकीय व्यवसाय आणि सामाजिक कामाची पार्श्वभूमी आहे. वैद्यकीय शिक्षण घेतानाच बुद्धीची चमक दाखवली होती. त्यांनी स्त्रीरोग या विषयाचं शिक्षण घेतलं.
समाजात राहून समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गडचिरोली हा जिल्हा निवडला या दोघांनी निवडलेलं हे कार्यक्षेत्र है असं होतं. सर्वच बाबतीत मागास इथे येऊन यांनी 'शोधग्राम' ऊर्फ 'सर्च' ची स्थापना केली. ज्या प्रमुख उद्देशाने हे नाव संस्थेला ठेवण्यात आलं, तोच उद्देश आजही कायम आहे. आरोग्यदूत प्रशिक्षण कार्यक्रमाची सूत्रं डॉ. राणी बंग सांभाळतात. डॉ. राणी बंग यांनी वैद्यकीय अभ्यासातल्या गोष्टी 'या' आगळ्यावेगळ्या प्रशिक्षणासाठी अतिशय सोप्या केल्या आहेत. डॉ. राणी बंग यांची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. गोईण' आणि 'कानोसा' गोईण म्हणजे गोंड आदिवासीच्या भाषेत मैत्रीण. या पुस्तकांमध्ये त्या भागात यांच्या नोंदी आणि इतर माहिती आहे. तर कानोसामध्ये, त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी आलेल्या अनुभवांविषयी, आदिवासी जीवनशैली आणि परस्पर संबंधांविषयी लिहिलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा