'इस्रो' मधील पहिल्या उच्चाधिकारी
गीता वर्धन
'च्या हैदराबाद येथील 'अॅडव्हान्स डाटा रिसर्च इन्स्टिट्यूट' च्या संचालक गीता वर्धन या डॉ. वाय. नायुडम्मा पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञ आहेत. 'इस्रो'मधील त्या पहिल्याच महिल्या उच्चाधिकारी आहेत. उपग्रह प्रक्षेपणाच्या कामगिरीतील उपग्रहाचा डाटा संपादित करून त्याचा उपयुक्त उत्पादनात वापर करण्याबाबतचे त्यांचे संशोधन उल्लेखनीय आणि अपूर्व आहे!
गीता वर्धन उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाल्या. त्या सांगतात त्यावेळी त्यांच्या वर्गात त्या एकट्याच महिला होत्या. आज या विद्यापीठात गेल्यानंतर या विभागात ५० टक्के असणारी मुलीची संख्या | पाहून आपणास अभिमान वाटतो, असे त्या सांगतात. पदवी घेतल्यावर | बेंगलोरच्या एसआरडीई या इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनीत त्यांनी प्रथम सेवा बजावली; पण लवकरच त्या अंतराळ विभागाच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीत दाखल झाल्या. देशभर रिमोट सेन्सिंग सर्व्हिस | सेंटर्स उभा करण्यात त्यांचा सहभाग मोठा आहे.
पुढे 'इस्रो'च्या सॅटेलाईट डाटा तयार करण्याच्या कामात 'थिंक टैंक' म्हणजे 'संकल्पना निर्माती' अशी मोलाची भूमिका बजावली. सॅटेलाईट डाटा अत्यंत वेगाने उपयुक्त प्रणालीमध्ये बदलण्याचे काम त्यांच्या मेहनत आणि संशोधनाचेच फळ आहे. त्यांना सन २००८ चे 'इम्रो मेरिट अॅवॉर्ड' पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते देण्यात आले. गीता वर्धनना 'इस्रो'च्या जबाबदारी व्यतिरिक्तचं जीवन कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून जगायला आवडतं. त्या स्वयंपाक करतात, सिनेमे पाहतात, वाचन करतात. संगीताचीही त्यांना आवड आहे. देवळात जायला आणि अध्यात्माच्या पुस्तकांचं वाचन करायलाही आपल्याला भावतं, असं त्या सांगतात.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق