विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

खाशाबा जाधव




 खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यातील एका दलित कुटूंबात झाला. त्यांची कुस्ती खेळात ख्याति होती. भारत देशातील ते ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते. सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयात कराड तालुक्यातील गोळेश्वर या खेडेगावात खाशाबा जाधवचा जन्म झाला. ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचा हा सर्वात लहान म्हणजे ५ क्रमांकाचा मुलगा होता. याने ८ वर्षाचा असताना त्या भागातील प्रशिद्द असणार्‍या चॅम्पियनला २ मिनिटात लोळवून त्या भागातील एक अनभिज्ञ विनातक्रार चॅम्पियन ठरला होता. त्याने सन १९४०-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्याने त्याचे जीवन कुस्तिकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले.


त्याचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याचे वयाचे ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. महाविध्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही. भारताचे स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी भाग घेतला होता. त्याने ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचा निश्चय केला होता.


सन १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिक साठी फ्लायवेट गटासाठी यांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर हाते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा ६ वा क्रमांक पुढे घेवून जाणारा ठरला नाही. पुढील सन १९५२ सालच्या हेलसिंकी येथे होणार्‍या ऑलिंपिक साठी जरी ते पुढील बंटमवेट गटात (५७ की.) गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनल पर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी त्याना ब्रांझ पदकावर समाधान मानावं लागलं पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.


ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील सुंदोप सुंदीमुळे पुढील ऑलिंपिक साठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्याना सांगण्यात आले. त्यांचे म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिंपिक साठी निवड झाली नाही. या वेळी ते शांत बसले नाहीत तर याचा खुलासा घेणेसाठी त्यांनी पतीयाळाचे महाराजे यांचेकडे न्याय मिळण्यासाठी विनंती केली. पतीयाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबाचा मुद्दा उचलून धरला आणि त्याचे विरोधी कुस्तीगीराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली त्यात त्याने त्याला चितपट केले आणि त्याची ऑलिंपिक साठी निवड झाली. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत ! कुटुंबाची पळापळ सुरू झाली. गावात लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरचे राजाराम महाविध्यालयात शिकत होता. त्या महाविध्यालयाचे प्राचार्य बरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विध्यार्थी ऑलिंपिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहान ठेऊन त्याला रु.७०००/- दिले. त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचेकडे निधीसाठी घळ घातली पण त्यांनी फक्त रु.४०००/- दिले.


गादीवरील कुस्तीत पाय घसरतात. खेळताना दोन चुका झाल्या त्याने गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले, असे त्यांचे बरोबर गेलेले त्यांचे चुलत भाऊ संपतराव जाधव म्हणाले.


कराड तालुक्यातील गोळेश्वरर हे लहानस गाव ! कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणार्‍या खाशाबाचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजविलेल्या १५१ बैलगाड्या, हजारो लोक, ढोल तासे, लेजिम पतके, फटाके, घेवून हजर होते. गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता. हे अंतर पायी चालावयाचे झाले तरी १५ मिनिटांचे आहे पण हेच अंतर पार करण्यासाठी विनातक्रार सात तास लागले. हा प्रकार मी पुर्विही आणि त्यानंतर ही कधी पाहिला नाही असे संपतराव जाधव म्हणाले. एका कोपर्‍यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वरर गाव भारताचे नकाशावर ठळकपने दिसू लागले. भारत देशाला ऑलिंपिक मध्ये पदक मिळवून देणार्‍या या गोळेश्वर गावाची जगभर प्रशिद्दी झाली.


भारताचे हॉकी टीमने ही गोल्ड मेडल पटकावले होते पण खाशाबाचे विशेष कौतुक झाले. कोल्हापूर मधील सर्व तालिम आखाड्यानी तसेच महाविध्यालयांनी भरभरून कौतुक केले. खाशाबाने कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले त्यात स्वतः ही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या. त्यात जी कमाई झाली ती त्याचेवर स्वतःचे घर गहान ठेवून मदत करणारे आणि वरदहस्त ठेवणारे महाविध्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळण्यासाठी पैसे दिले.


सन १९५५ मध्ये ते सब इंस्पेक्टर या हुद्दयावर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. तेथे अंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलिस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि अशीस्टंट पोलिस कमिशनर या हुद्दयावरून निवृत्त झाले. पेन्शन साठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे जीवन गरिबीत गेले. त्यांचा सन १९८४ मध्ये एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق