विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

नर्तकी अजिजन


     
             *नर्तकी अजिजन* 


              सन १८५७ च्या स्वातंत्र्य  युद्धात ज्या महान स्त्रियांनी पराक्रम गाजविला आणि आपले नाव आपल्या देशाच्या इतिहासात अमर केले, अशा स्त्रियांमध्ये कानपूरची अजिजन बेगम हिचाही समावेश करायला हवा. अजिजन ही पेशाने नर्तकी व गायिका होती. ती कानपूरातील एक प्रतिष्ठित स्त्री होती. गोल चेहरा, आकर्षक नेत्र, भरदार  सुदृढ व सुडौल शरीरयष्टी, कोकीळेसारखा गोड कंठ यामुळे तिची मोहीनी कोणावरही सहज पडे. नृत्यकलेत या गायनात ती कानपूरच्या परिसरात प्रख्यात होती. तिच्या पायातील नुपूरांच्या झंकाराने व सुरेल गायनाने वातावरणात बेहोशी निर्माण होत असे. तिच्या मैफिली तिच्या महालात मोठमोठ्या लोकांच्या दिवाणखान्यात व बड्या  इंग्रज  अधिकारा-यांच्या प्रशस्त बंगल्यात होत असत. त्यामुळे कानपूरच्या परिसरातील बड्या लोकांशी व इंग्रज अधिका-यांशी तिचा चांगला परिचय होता.
            अजीजन पराक्रमी  पुरुषांचा आदर करायची. फक्त नृत्य व गायन हाच तिचा व्यवसाय होता. तिचा वावर बड्या बड्या लोकांत नेहमीच असायचा.  बडे बडे  सरदार, नानासाहेब पेशवे, बडे इंग्रज अधिकारी  तिच्यावर फिदा होते. अजीमुल्लाखाँ हा बुध्दीमान, देखणा व विद्वान पुरुष जेव्हा  नानासाहेब पेशव्यांच्या दरबारात मंत्री म्हणून आला. तेव्हा ती त्याचीही विश्वासपात्र बनली होती. 
            अजीजन ही आपल्या व्यवसायामुळे श्रीमंत बनली होती. तिला कधीही कशाचीही उणीव भासत नसे. अगदी सुखात लोळायची ती.पण १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात तिने सुखाला लाथ मारली व त्या युद्धात तीने हिरीरिने भाग घेतला. घोड़ा पळविण्यात तर ती तरबेज होतीच, पण सफाईने तलवारही चालवायची.
           दिल्लीत स्वातंत्र्य  युद्धाची धुमश्चक्री में १८५७ मध्ये सुरू झाली. कानपूरच्या इंग्रजांच्या छावणीतील देशी पलटण अस्वस्थ होऊन इग्रजांविरुद्ध लढायला अधीर झाली. तिचा सुभेदार टीकासिंह नानासाहेबांना भेटला. एके दिवशी सायंकाळी नानासाहेब,  त्यांचे बंधू बाळासाहेब, अजीमुल्लाखाँ, तात्या टोपे, सुभेदार टीकासिंह, जमादार शमसुद्दीन हे गंगेच्या घाटावर एकत्र आले. गंगेत नौकाविहाराला निघाले. तेव्हा त्या नौकेत नानासाहेबांसह सर्वांनी स्वातंत्र्ययुद्धात एक दिलाने व निष्ठने भाग घेण्याच्या शपथा घेतल्या. आपली पलटण स्वातंत्र्य युद्धात उतरण्यासाठी अधीर झालेली आहे. असे टीकासिंहाने सांगितले. जमादार शमसुद्दीनने त्याला दुजोरा दिला.  लढ्याची योजना आखली गेली व सर्वजण परत आपल्या निवासस्थानी निघून गेले.
             कानपूर छावणीचा सेनाधिकारी व्हीलर व कलेक्टर हिलर्डसन यांनाही बंडाची भीती वाटू लागली. त्यांना कानपूरमधील छावणीच्या खजिन्याच्या रक्षणाची चिंता वाटत होती. छावणीत गोरे सैन्य थोडेसेच होते. नानासाहेब तर त्यांचा विश्वासू मित्र होता. त्यांनी नानासाहेबाला सैन्य व तोफा घेऊन विठूराहून कानपूरला बोलाविले. नानासाहेब २०० सैनिक व २ तोफा घेऊन कानपूरला आले. त्यांना नवाबगंजमधील सरकारी खजिन्याच्या रक्षणाचे काम सोपविण्यात आले.
             नानासाहेब सतत या इंग्रज अधिका-यांचे आदरातिथ्य करायचे. पण आपले ८ लाखांचे पेन्शन इंग्रज  सरकारने बंद केल्याने ते मनातून इंग्रज  सरकारवर चिडलेले होते. संधी येताच उठाव करायचा म्हणून त्यांनी वरीलप्रमाणे युध्दात उडी घ्यायचे निश्चित केले होते. ५ जून १८५७ रोजी सुभेदार टीकासिंह यांच्या नेतृत्वाखाली कानपूरच्या देशी पलटणीने इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले.  त्या आधी २ जून १८५७ रोजी जमादार शमसुद्दीनने अजीजनची तिच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्याने तिला इंग्रजाविरुध्द ठरलेला उठावाची योजना समजावून सांगितली. तिनेही त्या उठावात भाग घेण्याची तयारी उत्साहाने त्याला सांगितली व युद्धात सोपवाल ती कामगिरी करण्याचे त्याला वचन दिले. नानासाहेब व अजीमुल्लाखाँ यांनी तिच्याकडे बेमालुम हेरगिरी करण्याचे सोपविले आहे, असे शमसुद्दीनने तिला सांगितले. त्यामुळे तिचा उत्साह दुणावला. तिने तिच्या विश्वासपात्र मैत्रिणींसह हे काम करावे.  त्यांचीही लहानशा पलटण तयार करावी, असे सांगून शमसुद्दीन घरी परतला.
             अजीजनला व तिच्या मैत्रिणींना घोड्यावर रपेट करण्याचा सराव आधीच होता. अजिजन तर सफाईने तलवार चालविण्यातही तरबेज होती. तिने आपल्या मत्रिणींचे सैन्य गुप्तपणे उभारले. युद्धात आपण कोणते काम गुप्तपणे करायचे हे ही तिने त्यांना सांगितले. सगळ्या जणींना पुरूष वेषात युद्धात भाग घेऊन हेरगिरी करायची व गुप्त बातम्या आणायच्या. अजीजनने त्या बातम्या अजीमुल्लाखाँच्या मार्फत नानासाहेबांना द्यायच्या. अजीजनने रात्री इंग्रज अधिका-यांच्या बंगल्यात नाचगाणे करायचे.  ते मद्य पिऊन धुंद झाले की, त्यांच्याकडून त्यांचे युद्धाचे बेत जाणून घ्यायचे व अजीमुल्लाखाँला सारे काही सांगायचे, असे ठरले व सा-या जणी त्या युद्धात सहभागी होऊन कामाला लागल्या. आपले काम जोखमीचे आहे. इंग्रजांना जर आपल्या या कामाचा संशय आला  तर मरणाशीच गाठ आहे, असेही तिने त्यांना बजावून सांगितले.
              ठरल्याप्रमाणे अजीजन हेरगिरीचे काम करू लागली. इंग्रज अधिका-यांच्या गोटातल्या महत्वाच्या बातम्या अजीमुल्लाखाँमार्फत नानासाहेबांकडे पोचवू लागली. नानासाहेब तिच्या हेरगिरीवर खुश होत असत. अखेर कानपूर नानासाहेबांनी जिंकले. अजीजन त्या विजयोत्सवात आपल्या मैत्रिणीसह सहभागी झाली. या युद्धात त्यांनी जखमी शिपायांवर औषधोपचारही केले होते. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली होती. त्यांच्या कामांवर खुश होऊन नानासाहेबांनी तिला व तिच्या मैत्रिणींना पारितोषिके दिली. नानासाहेब विठूर येथे समारंभपूर्वक गेले. तेथे त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही.
             इलाहाबादहून हॕवलाॕक व नील मोठे सैन्य व तोफखाना घेऊन कानपूर जिंकण्यासाठी आले. तात्या टोपे आता नानासाहेबांचा सेनापती होता. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात  अजीजनने हेरगिरीचे का उत्कृष्टपणे बजावले. पण नानासाहेबांचा या युद्धात पराभव झाला. ते विठुरला निघून गेले. तात्याही उरलेले सैन्य घेऊन काल्पी ग्वाल्हेरकडे निघून गेले. विठूरचा इंग्रजांनी विध्वंस केला. पकडलेल्या सैनिकांना फाशी देऊन किंवा गोळ्या घालून ठार करण्यात आले. नव्या इंग्रज अधिका-यांना अजिजनच्या हेरगिरीबद्दल समजले. त्यांनी तिला अटक केली. तिच्या अनुपम सौंदर्यावर ते अधिकारी मुग्ध झाले. त्यांनी तिने केलेल्या कृत्यांबद्दल माफी मागण्यास सांगितले. माफी मागितली तर तुला सोडून देण्यात येईल असेही सांगितले. पण ती देशाभिमानी सौंदर्यवती बाणेदारपणे वागली. ती हॕवलॉकला म्हणाली, "मी आमच्यावर अन्याय करणा-या इंग्रजापुढे मुळीच माफी मागणार नाही.' अखेर तिला एका झाडाच्या खोडाला बांधण्यात आले. हॅवलॉकने हूकूम सोडला. " फायर, 
"गो-या सैनिकांनी आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी तिच्या सुंदर शरीराची चाळणी करून टाकली. धन्य ती नर्तकी अजिजन !
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा