समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक ईश्वरचंद्र विद्यासागर
जन्म.२६ सप्टेंबर १८२० रोजी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमध्ये.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि विधवा विवाहाच्या विरोधात आवाज उठवला. इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या समन्वयामुळेच भारतीय आणि पाश्चिमात्य परंपरांचं ज्ञान मिळू शकतं असं त्यांचं मत होतं. मेदिनीपूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते आपल्या वडिलांबरोबर कोलकात्याला गेले. त्यांची आकलनक्षमता उत्तम होती. हुशार असल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या मिळाल्या. म्हणून त्यांना विद्यासागर ही पदवी मिळाली. १८३९ मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. १८४१ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षा ते फोर्ट विलियम कॉलेजमध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले. १८४९ मध्ये साहित्याचे प्राध्यापक म्हणून पुन्हा त्यांचा संस्कृतशी संबंध आला. आपल्या समाज सुधारणेच्या अभियाना अंतर्गत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थानिक भाषा आणि मुलींच्या शिक्षणासाठी शाळांची एक साखळी उघडली आणि कोलकात्यात मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली. संस्कृत कॉलेजचे मुख्याध्यापक झाल्यावर त्यांनी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे दरवाजे उघडले. त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाहाचा कायदा १८५६ साली संमत झाला. प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचा विवाह एका विधवेशी लावून दिला होता. त्यांनी बहुपत्नीत्व आणि बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे २९ जुलै १८९१ रोजी निधन झाले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق