विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

रवि वर्मा

 त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा 
जन्म. २९ एप्रिल १८४८
राजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्याच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रविवर्मा यांनी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्माला सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्याच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. राजा रविवर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्यांना अधिकच प्रेरणा मिळाली. १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्म्याने सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले. राजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्याचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्याने तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आला. राजा रविवर्म्याने चित्रांतील विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्याचे 'दुष्यंत व शकुन्तला','नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रांनी भारतीयांस त्यांच्या धर्मग्रंथांतील द्दष्ये डोळ्यासमोर साकार झाली. ही त्याची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविवर्मा यांचे नाव घेतले जाते. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले. आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. भारतीय कलेच्या इतिहासात तो उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजला जातो.
१९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्याचे नांव 'राजा रवि वर्मा' असे नोंदविलॆ गेले. मावेलिकरा, केरळ येथे त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे. *मा राजा रविवर्मा* यांचे २ ऑक्टोबर १९०६ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा