बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे
जन्म.१९ मे १८२४
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. थोरले बाजीराव यांच्या नंतर शाहू महाराजांनी त्यांना मराठा साम्राज्याचे पेशवे बनवले. त्यांच्याच काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले. मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहण्याची कामगिरी नानासाहेब पेशव्यांच्या नावावर आहे.
२५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी सातारा दरबारी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात जरब बसवली. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य ताकत बनली. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा नानासाहेब पेशवे यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्या धक्काने त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले. नानासाहेबांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. १७४९ साली छत्रपतींचा शाहू महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर नानासाहेबच मराठा राज्याचे सर्वसत्ताधीश झाले. शाहू महाराजांचे वारस रामराजे हे सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होते. तरीही नानासाहेबांनी छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला. त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. नानासाहेबांनी छत्रपतींना दरवर्षी पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारात ठरवण्यात आले.
नानासाहेबांचा शत्रूला किती वचक, धाक व विश्वास होता हे पोर्तुगीज, इंग्रज, निजाम, अहमदशहा अब्दाली व मोगल दरबार यांच्या पत्रांवरून स्पष्ट दिसून येतो. राज्यकर्ता हा केवळ आक्रमक दिसून चालत नाही तर तो विश्वासूही दिसावा आणि असावा लागतो. नानासाहेबांच्या विश्वासनियतेची दोन जबरदस्त उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेबांस पेशवाईची वंशपरंपरागत दिलेली सनद व दिल्लीच्या बादशहाने स्वसंरक्षणार्थ केलाला अहमदीया करार.
पेशवा या पदावरील व्यक्तिच्या जबाबदार्याी शिवछत्रपतींच्या 'कानुन जाबता' मध्ये स्पष्ट केल्या आहेत. नानासाहेबांनी त्याचे तंतोतंत पालन करून नियोजनबद्ध पध्दतीने स्वराज्याचा केवळ विस्तारच केला नाही, तर स्वराज्य आर्थिक दृष्या मजबूत केले. अंतर्गत प्रशासकीय, व्यवस्थापन, कायदेव्यवस्था, शिस्तबध्द आर्थिकव्यवस्था, नवनवीन आर्थिक स्त्रोतांना उत्तेजन, स्वराज्याच्या उन्नत्तीला अनुसरून ठरविलेले परराष्ट्रीय धोरण, कला व्यापाराला चालना, शेतीला प्राधान्य, सेना उभारणी, सैनिकांच्या कुटुंबाची व्यवस्था, नगरविकास, धार्मिक स्थळांना संरक्षण, नदीवरील घाट, पाणीपुरवठा यावर जातीने लक्ष ठेवून उल्लेखनीय कामगीरी बजावली. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील सर्व समाज समावेशक धोरण अनुसरून स्वराज्य सार्वभौम केले. नानासाहेब पेशवे यांचे २३ जून १७६१ रोजी निधन झाले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق