विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

आर एन पराडकर

 दत्त दिगंबर दैवत माझे’ आणि अशी अनेक दत्तगीते अजरामर करणारे आर एन पराडकर 

उभ्या महाराष्ट्रात आपल्या अत्यंत  गोड गळ्यासाठी मुख्यतवे श्री दत्त गीते ह्यासाठी अधिक विख्यात असे थोर गायक आर. एन. पराडकर यांचे पूर्ण नाव रघुनाथ नारायण पराडकर  होय. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे आर. एन. पराडकरांचं बालपण कथाकीर्तन ऐकण्यात गेलं. पंडित भास्करबुवा बखले यांनी त्यांना शिष्य म्हणून शिकवायची तयारी दर्शवली. नंतरच्या काळात भास्करबुवांचं अचानक निधन झालं आणि आर. एन. पराडकरांचं प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं. आर एन पराडकर हे १९३९ साली आकाशवाणी कलावंत म्हणून दोन वर्षे नोकरीला होते. त्यांचे मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद आणि बडोदा या केंद्रांवरून गाण्याचे कार्यक्रम होत असतात. त्यानंतर पायाची दासी व बाईलवेडा या चित्रपटात प्लेबँक दिले होते. भावगीते गाण्याइतकाच शास्रोक्त गाणे व हुमरी, या गाण्यांतही त्यांना आनंद वाटत असे. 



 राजा बढे कृत  'वसंतोत्सव' व 'सीताविरह' या रेडिओवर झालेल्या ऑपेरांचे संगीत दिग्दर्शन यांनी केले होते. आर. एन. पराडकर यांनी यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. दत्तगुरूंच्या गाण्यासोबत त्यांची इतर गाजलेली गाणी म्हणजे ‘नको वाजवू श्रीहरी मुरली’आणि ‘ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ’बरीचशी गाणी रेडीओवर म्हटली असल्याने ती बहुतेक आकाशवाणीच्या संग्रहात असावीत. त्यांच्या कार्यक्रमात एका गवळणीची नेहमी फर्माईश व्हायची. ती गवळण म्हणजे ‘गवळणींनो जाऊ नका बाजारी’ परंतु या गाण्याची रेकॉर्ड निघाली नाही.पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत.पूर्वी पुण्यातील श्रीनाथ टॉकीजच्या पहिल्या खेळाची सुरुवात होत असे. पराडकर यांच्या दत्त गाण्याने होजेष्ठ गायक श्रीपाद पराडकर हे आर एन पराडकर यांचे पुतणे होत.

गायिका दीपा साठे या श्रीपाद पराडकर यांच्या कन्या. दीपा साठे पराडकरांची गाणी म्हणतात.

आर.एन.पराडकर यांची गाणी

दत्त दिगंबर दैवत माझे, मज भेटूनी जा हो दत्तगुरू अवधूता,आज मी दत्तगुरू पाहिले,दत्तगुरू सुखधाम,श्रीपादश्रीवल्लभ दिगंबरा, जयजय दत्तराज माऊली,माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया,पारंपारिक दत्ताची आरती!

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق