महान आचार्य व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली
जन्म. ५ सप्टेंबर १८८८
शुद्ध चारित्र्य, प्रकांड पांडित्य, अपार सहिष्णुता आणि प्रभावी, वक्तृत्व यामुळे डॉ. राधाकृष्णन यांना जगभर विलक्षण लोकप्रियता मिळाली. शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. मूर्तिमंत दारिद्र्यातून त्यांनी आपले जीवन उभे केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेता देहदंड न सोसता ते हिंदुस्थानातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतिपदावर आरूढ झाले. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम त्यांनी आपल्या दहा हजार रुपये पगारात कपात करून केवळ अडीच हजार रुपये पगार घेण्याचा निर्णय घोषित केला. भूतपूर्व अर्थमंत्री स्व. सी. डी. देशमुख तेव्हा केवळ एक रुपया पगार घेत होते. त्याकाळी जास्तीतजास्त कोण त्याग करतो अशीच स्पर्धा होती. सिमल्याचे भव्य वैभवशाली प्रसाद जे ब्रिटिश व्हाइसरॉयसाठी बांधण्यात आले होते, ते एका संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी देऊन ते राष्टÑपती भवनात राहावयास आले. डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपतिपदावर विराजमान होताच चीनने हिंदुस्थानावर आक्रमण केले. पंतप्रधान पंडित नेहरूंचा ‘हिंदी चिनी भाई भाई’ हा नारा हवेतच विरला. त्या वेळी डॉ. राधाकृष्णन पुढे सरसावले व आणीबाणी जाहीर केली. या दोन महापुरुषांनी देशाला मदतीचे आवाहन केले दोघेही त्यागी अन् चारित्र्यसंपन्न. अवघ्या देशाचा त्यांच्यावर विश्वास. लक्षावधी तरुण पुढे आले, मातृभूमीसाठी सैन्यात भरती झाले. वस्त्र, धान्य, पैसा देशभरातून हजारो ट्रकांमधून येऊ लागले. हजारो महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने, मंगळसूत्र देऊन देशास सर्वतोपरी मदत केली. पक्षीय मतभेद दूर सारून जात-पात -धर्म पंथ विसरून लक्षावधी माणसे देशासाठी उभे राहिले. राष्ट्रपतिपद हे केवळ देखाव्यासाठी नसून घटनात्मकदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वश्रेष्ठ पद आहे. हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या जवानांनीही या वेळी दाखवलेले शौर्य सुवर्ण अक्षरांनी लिहावे असेच आहे. चीनने अखेर माघार घेतली. विश्रांती हा शब्दच डॉ. राधाकृष्णन यांच्या शब्दकोषात नव्हता ते सच्चे देशभक्त होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मातृभूमीची सेवा केली आणि डोव्व्यांत तेल घालून राष्ट्रचे संरक्षण केले. देशाला आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रांत प्रामुख्याने स्थैर्य मिळवून दिले आणि जगभर देशाचा लौकिक वाढविला. अमेरिकेने ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हे सर्वोच्च पदक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच एडिनबरा विद्यापीठानेही गौरव केला. सोव्हियत रशियानेही त्यांचे भव्य स्वागत केले. जगभरातील विविध देशांशी त्यांनी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
१९६७ मध्ये हिंदुस्थानात चौथी सार्वजनिक निवडणूक झाली. सर्व पक्षांचा आग्रह असतानाही ते राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाले आणि त्यांनी दिल्ली सोडली. आयुष्यातील शेवटचे दिवस वाचन, मनन-चिंतनात शांतपणे घालवावे म्हणून ते मद्रासला आले. शेवटची आठ वर्ष त्यांनी अत्यंत शांतपणे घालवली. डॉ. राधाकृष्णन यांचे १७ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق