विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

लेखिका पुपुल जयकर

लेखिका पुपुल जयकर 

जन्म. ११ सप्टेंबर १९१५

पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेरअ ली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला. पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अंड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या. पुपुल जयकर यांचे २९ मार्च १९९७ रोजी निधन झाले. .

🙏🙏

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق