हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री महादेवी वर्मा
जन्म. २६ मार्च १९०७
महादेवी वर्मा यांचे प्राथमिक शिक्षण इंदुरातल्या मिशन शाळेत सुरू झाले. बरोबरच संस्कृत, इंग्रजी, संगीत आणि चित्रकलेचे शिक्षण शिक्षक घरी येऊन देत असत. १९१९ मध्ये अलाहाबाद मधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन त्या १९३२ मधे अलाहाबाद विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या. महादेवींचे कार्यक्षेत्र लेखन, संपादन व अध्यापन होते. अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात हे काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते. ह्या विद्यापीठाच्या त्या प्रधानाचार्य व कुलगुरू पण होत्या. १९३२ मध्ये त्यांनी चाँद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य संपादक झाल्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते
. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे. प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते. १९५६ मधे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य अॅकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देऊन भूषविले. 'यामा' नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला.
१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह चीनी भाई' वर 'नील आकाशेर नीचे' नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी ’ ’बिंदा, सांबिया आणि... ’या नावाने प्रकाशित झाला आहे.*महादेवी वर्मा* यांचे ११ सप्टेंबर १९८७ रोजी निधन झाले.
🙏🙏🙏🙏
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق