जिथे 'मनाला भीती शिवत नाही आणि मस्तक उन्नत आहे; जिथं ज्ञान मुक्त आहे; जिथं समाज दुभंगलेला नाही संकुचितपणाच्या घरगुती भिंतींनी; जिथं शब्द बाहेर पडतात सत्याच्या खोल दरीतून उत्स्फूर्तपणं; जिथं पूर्णत्व मिळवण्यासाठी अखंड उद्यमशीलता आपले बाहू पसरत आहे; जिथं रूढीचं वाळवंट विचारांचा निर्मळ ओघ ग्रासून टाकत नाही; जिथं होतात समृद्ध विचार आणि आचार तुझ्या प्रेरणेनं...
अशा त्या स्वातंत्र्याच्या स्वलोकात, हे तात,
माझा देश जागृत होऊ दे.
रवींद्रनाथ टागोर या महाकवीचं स्वातंत्र्याचं स्वप्न असं मंगल आणि उदाल होते.
आपल्या कवितांमधून ते केवळ स्वतःची व्यथा सांगत नव्हते कोट्यवधी भारतीयांची मुकी व्यथा त्यांच्या शब्दांतून प्रकट होत असे. रवींद्रनाथांच्या कवितेनं भारताला फक्त स्वप्नं पाहायला शिकवलं नाही, तर आपली दुःखं ओळखायला शिकवलं. त्यांच्या दु:खांना वाचा फोइन त्यातून मार्ग काढायला शिकवलं, म्हणूनच मारा भारत त्यांना गुरुदेव मानू लागला.
रवींद्रनाथांचा जन्म बंगालमधल्या प्रसिद्ध व सुधारक अशा टागोर कुटुंबात ७ मे १८६१ रोजी झाला. राजा राममोहन रॉय यांचे जवळचे मित्र दवारकानाथ टागोर हे रवींद्रनाथांचे आजोबा टागोर कुटुंब संपन्न होते. गुरुदेवांचे वडील देवेंद्रनाथ एक मोठे सुधारक आणि ज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते. लोक त्यांना 'महर्षी' म्हणत अशा विवेकनिष्ठ आणि मानवतावादी पित्याच्या देखरेखीखाली रवींद्रनाथांचं शिक्षण झालं. पुढं ते इंग्लंडला शिक्षण घेण्यासाठी गेले; परंतु पदवी मिळवण्यात त्यांना रस नव्हता, म्हणून पदवी न घेताच ते परत आले.
मात्र रवींद्रनाथांचा व्यासंग फार मोठा होता सतत वाचन करणं आणि त्याच्यावर विचार करणं, हा त्यांचा छंद होता. त्यामुळेच ते मोठे विद्वान होऊ शकले. रवींद्रनाथ जसे थोर कवी होते, तसेच थोर कादंबरीकार, कथाकार, नाटककार, विचारवंत आणि निबंधकारदेखील होते; चित्रकार आणि संगीतकारही होते.
'रवींद्रसंगीत' म्हणून संगीतातही त्यांनी एक विशिष्ट शैली निर्माण केली.
शाळेच्या घराच्या चार मिर्तीआड त्यांचं मन रमत नसे. निसर्गात रवींद्रनाथ जास्त रमत. फुलं, फुलपाखरं, पक्षी, झाडं यांचं त्यांना विलक्षण आकर्षण. त्यांचं आभाळाएवढं मन आभाळाशी एकरूप होत असे आभाळाचा, त्याच्या वेगवेगळ्या रंगछटांचा, मुक्तपणं फिरणाऱ्या मेघांचा रवींद्रनाथांना फार मोह होता जमीन, शेतं, डोंगर कपारी, नदया, झरे आणि क्षितिजाला भिडणारा सागर या साज्यांविषयी रवीनांना विलक्षण प्रेम होते
आपल्या या सुंदर आणि संपन्न भारतमातेला इंग्रजांनी पायाख त्यांना सहन होत नव्हतं, म्हणूनच ते इंग्रजी सत्तेविरुद्ध उभे राहिले.
१८९७ सालची गोष्ट. बंगाल प्रांतिक परिषदेचं अधिवेशन 'नाटोर' या गावात भरलं होतं. त्या काळी अशा अधिवेशनातूनसुद्धा इंग्रजीतून भाषणं होत असत. रवींद्रनाथांना हा मातृभाषेचा अपमान वाटला. त्यांनी नाटोरच्या परिषदेत ठराव आणला, की परिषदेतली सर्व भाषणं
बंगालीमधून झाली पाहिजेत. त्यांच्या या ठरावानं त्या वेळी मोठं वादळ निर्माण झालं. राष्ट्रीय जागृती करायची, तर लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेतूनच सभा-संमेलनांचं काम चाललं पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.
१९०५ मध्ये ब्रिटिश सरकारनं बंगालची फाळणी केली. ही फाळणी म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्यावर आघात करण्याचा डाव होता. भारतीय राष्ट्रवादयांमध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटिश सरकारनं 'फोडा आणि राज्य करा' असं धोरण स्वीकारलं होतं. त्यामुळे बंगालमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आणि देशभर ती पसरत गेली.
रवींद्रनाथांनी या वंगभंगविरोधी चळवळीत भाग घेतला. या कार्यासाठी त्यांनी आपली लेखणी आणि वाणी प्रभावीपणं वापरली. 'भांडार' नावाचं मासिक ते चालवत असत. त्यामधून रवींद्रनाथांनी स्वदेशीच्या चळवळीचा प्रसार केला
खरा भारत हा लक्षावधी खेड्यांमधून पसरलेला आहे. ग्रामोद्धार झाल्याशिवाय भारताचा विकास होणार नाही, याची रवींद्रनाथांना पुरेपूर जाणीव होती, म्हणूनच पुढं 'शांतिनिकेतन'ला जोडून त्यांनी 'श्रीनिकेतन' उघडलं. ग्रामोद्धाराच्या या केंद्रात शेती, गो-पालन, चर्मोद्योग, हातमाग, कलाकुसरीचं काम इत्यादी व्यवसायांचं शिक्षण दिलं जाऊ लागलं.
रवींद्रनाथांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. मुख्यतः त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहामुळे सारं जग त्यांना ओळखू लागलं. या काव्याला १९१३ साली जगातील उत्कृष्ट साहित्याचं 'नोबेल' पारितोषिक मिळालं. हा मान मिळवणारे आशिया खंडातले ते पहिले साहित्यिक होते. या बहुमानाबद्दल ब्रिटिश सरकारनं त्यांना 'सर' हा किताब बहाल केला.
रवींद्रनाथांच्या 'गीतांजली'ची जगातल्या अनेक भाषांमधून भाषांतरं झाली. पारितोषिकाच्या रूपानं मिळालेले सव्वा लाख रुपये रवींद्रनाथांनी 'शांतिनिकेतन'ला देऊन टाकले.
रवींद्रनाथ हे सर्वांगीण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. निसर्गाच्या सान्निध्यातच व्यक्तीचा विकास होतो, असं त्यांचं मत होतं. 'शांतिनिकेतन विद्यालय' स्थापन करण्यातदेखील त्यांच हाच उद्देश होता. आजही 'शांतिनिकेतन मध्ये नृत्य, संगीत, चित्र, नाट्य, साहित्य या कलांच शिक्षण दिलं जातं. रवींद्रनाथांनी शिक्षणाला अशी एक नवी दिशा दाखवली.
जगातल्या घडामोडींवर त्यांचं बारकाईनं लक्ष असे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत शुरु केलेल्या वर्णभेदविरोधी आंदोलनात भाग घेण्यासाठी रवींद्रनाथांनी आपले सहकारी सी. ए. अँड्र्यूज व पिअर्सन यांना आवर्जून पाठवलं होतं.
१९९९ साली अमृतसरच्या जालियनवाला बागेत इंग्रजांनी शेकडो लोकांची कत्तल केली. देश पेटून उठला. रवींद्रनाथांनी त्याच्या व्हाइसरायला लिहिलं:
'हे अत्याचार सरकारला काळिमा फासणारे आहेत. लाजिरवाणे आहेत. माझ्या हिंदी बांधवांची सरकारकडून अशी मानखंडना होत असताना मला आपण दिलेला 'सर' हा किताब धारण करणं लज्जास्पद वाटतं. त्याकरिता मी आपला किताब परत करत आहे !'
- आणि त्यांनी हा किताब परत केला.
रवीनाथांनी 'विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. हे विश्व माझे घर' अशी जाणीव प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण करणं, हे विश्वभारतीचं ध्येय होतं. रवींद्रनाथांना वाटे, की आपल्या विद्यापीठात जगातील सर्व देशांतून लोक यावेत विविध कला इथे फुलाव्यात अनेक संस्कृतीचा इथं संगम व्हावा, स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाचे संस्कार त्यांच्या मनावर घडावेत. 'विश्वभारती साठी रवींद्रनाथांनी अपार कष्ट उपसले.
सखोल तत्त्वचिंतन, वैज्ञानिक दृष्टी, निसर्गप्रेम संपन्न अभिरुची, मानवतावाद या सान्या गोष्टी रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेल्या होत्या. या एकत्वाचा सुंदर आविष्कार म्हणजे 'जनगणमन' हे त्यांचं गीत स्वतंत्र भारतानं त्याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.
देश स्वतंत्र झालेला पाहण्याचं भाग्य मात्र रवींद्रनाथांना लाभलं नाही. दिनांक ७ ऑगस्ट १९४१ रोजी हा महाकवी अनंतात विलीन झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा