विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर

 

 ज्येष्ठ संगीतकार  भास्कर चंदावरकर 

जन्म. १६ मार्च १९३६ पुणे येथे.

श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ सारखी अजरामर नाटय़कृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक  भास्कर चंदावरकर  

यांच्या मावशी सीता माविनकुर्वे या गायिका होत्या , त्या पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या शिष्या होत्या. चंदावरकर हे बालपणापासून पुण्यातील सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यासारख्या संगीतप्रेमीच्या सहवासात आल्यामुळे चंदावरकर यांच्या संगीतप्रेमास प्रोत्साहन मिळाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वाडिया महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यलय येथे झाले. भास्कर चंदावरकर यांनी रवीशंकर व त्याच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं. त्याचप्रमाणे त्यांनी परदेशी संगीताचे पद्धतशीरपणे शिक्षण घेतले. फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया मध्ये त्यांनी १९६५ ते १९८० पर्यंत संगीताचे प्राध्यापक म्ह्णून काम केले. त्याचप्रमाणे अह्मदाबादची नॅशनल इस्न्टिट्यूट ऑफ डिझाइन , पंजाब-हरियाणा विद्यापीठ , दिल्लीचे जवाहरलाल विद्यापीठ , बंगलोर येथील मॅनेजमेट  इन्स्टिटयूट या संस्थांमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापक म्ह्णून काम केले. अमेरिकेतही अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने , चर्चासत्रे , कार्यशाळा , भारतीय संगीत शिकवणे असे विविध प्रकारचे संगीतविषयक कार्यही त्यांनी केले.

चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यानंतर, त्यांना पश्चिमेकडचे संगीत खुणावू लागले होते. त्यामुळे टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच यांच्याकडून त्यांनी जॅझचे धडेही गिरवले होते. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केलं. विशेष म्हणजे प्रभा मराठे यांच्या दोन नृत्य नाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी १५ वर्षं संगीत प्रशिक्षक म्हणून काम केले. एकीकडे विद्यादानाचे काम सुरू असतानाच, १९७० पासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकीच एक प्रयोग १९७२ मध्ये क्लिक झाला. विजय तेंडुलकरांच्या "घाशिराम कोतवाल' ला त्यांनी दिलेले संगीत मराठी नाट्यरसिकांना भावले. आपोआपच चित्रपटांचा भव्य पडदा खुला झाल्याने चंदावरकर यांच्या प्रयोगशील वृत्तीला बहरच आला.मराठी, हिंदीसोबतच, पाश्चात्य चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनी उत्साहाने उचलली आणि ती यशस्वीपणे पेलली होती. संगीतकार म्हणून घाशीराम कोतवालच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा सामना हा सिनेमा चांगलाच गाजला. सामना मधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे याच सिनेमातले गाणे. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे. अनेक भारतीय भाषांमधले सुमारे ४० चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा "खंडहर",अपर्णा सेनचा "परोमा', अमोल पालेकरांचा ‘थोडासा रुमानी हो जाए', विजया मेहतांचा ‘रावसाहेब', जब्बार पटेलांचा"सामना', तसेच "आक्रित', "कैरी', "मातीमाय' हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट. श्वास या चित्रपटासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर १९४८ साली त्यांना ' संगीत नाटक अकादमी ' पुरस्कार मिळाला , २००२ साली त्यांना ' चैत्र ' या मराठी चित्रपटासाठी ' सर्वत्कृष्ट  संगीतकार  म्हणून राष्ट्रीय चित्रपट सन्मान मिळाला होता. घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना’, सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे. 'वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे' हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. भास्कर चंदावरकर यांचे २६ जुलै २००९ रोजी निधन झाले. संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीत दिलेली गाणी.

अजब सोहळा, ओंजळीत माझ्या माझे उसासे, कुणाच्या खांद्यावर,  कंठ आणि आभाळ दाटून गाव असा नि माणसं अशी, घेऊन रूप माझे चांदणं टिपूर हलतो वारा, चांदोबा चांदोबा भागलास, डोळ्यांत वाकुन बघतोस, तूच मायबाप बंधू , पुंडलिका भेटी परब्रह्म, बंद ओठांनी निघाला, बांधले मी बांधले इंद्राचे तोरण, माय-बाप सेवा पवित्र, मी फसले ग फसले, विषवल्लीब असुनी भवती, सख्या चला बागामधी, सख्या रे घायाळ मी, सांज आली दूरातून, सांज झाली तरी माथ्यावरी, हा दैवगतीचा फेरा,

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق