विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

सर श्री. जगदीशचंद्र बोस

 सर श्री. जगदीशचंद्र बोस


बंगाल प्रांत त्याकाळात राष्ट्रभक्तीसाठी अग्रेसर होता, तर मग विज्ञानात तो मागे कसा राहणार ? येथील एक देदीप्यमान तारा सर जगदीशचंद्र बोस या नावाने उदयास येत होता. पुढे भारताची पताका आपल्या कर्तृत्त्वाने सात समुद्रपार फडकविणारा होणार होता. जगदीशचंद्र बोस एक थोर वैज्ञानिक. जगदीशचंद्र बोस यांना हे कळून चुकले होते, की आपल्या देशाचे पुनरुत्थान शिक्षण आणि विज्ञान यांच्या अभ्यासाच्या बळावर होऊ शकते. वैज्ञानिक घडवण्याकरिता चिकित्सक वृत्ती, सचोटी, राष्ट्रप्रेम हे निर्माण करावे लागेल. श्री जगदीशचंद्र बोस यांचा जन्म सन ३० नोव्हेंबर, १८५८ साली बंगाल प्रांतात झाला. कुशाय बुद्धिमत्ता लाभलेल्या या संशोधकाने हिंदुस्थानात नवउन्मेष जागृत केला. या कारणाने साहजिकच इंग्रजांच्या मनात धडकी भरली. एकीकडे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, सामान्य जन तर एकीकडे बुद्धिमत्तेची मक्तेदारी नष्ट होण्याची चिन्हे यारूपाने उदयास येत होती आणि इंग्रजांनी ह्याचा धसका घेतला. जर भारतीयांना काही ध्येयांपासून दूर ठेवले तर आपण राज्य करू शकतो हे त्यांनी जाणले, त्याकरिता शिक्षण मातृभाषेच्या ऐवजी इंग्रजीतून देण्याचे ठरवले. यामुळे निश्चितच भारतीयांची त्यांच्या संस्कृतीशी जोडलेली नाळ तोडली जाईल. संस्कृत, संस्कृती आणि सनातन धर्मापासून ते दूर जातील आणि आपण राज्य करू हे एकमेव लक्ष्य ठरवले. एवढेच नव्हे तर भारतीय शिक्षकांची प्राथमिक शिक्षक म्हणूनच नियुक्ती करायची तरतूद केली. उच्च शिक्षण शिकवणे फक्त इंग्रज प्राध्यापकांना लागू होते कारण, जर भारतीयांना तसे करू दिले तर आपणच गुलाम होऊ अशी भीती इंग्रजांना वाटत होती. भारतात परतल्यानंतर बोस कोलकत्ताच्या प्रेसिडेन्सी महाविदयालयात रुजू झाले आणि पहिले भारतीय प्राध्यापक होण्याचा मान मिळवला. हे इतके साधे सोपे नव्हते. इंग्रजांना खुपणारे होते, आपल्या पंगतीत येतो की काय, अशी भावना उफाळू लागली त्यामुळे सहजच त्यांना कमी लेखणे आणि बोस यांचा पगार इंग्रज प्राध्यापकांपेक्षा एक त्रितियांश करणे, जेणेकरून हे पद रिकामे होईल ह्या उद्देशाने प्रयास केले. येथे दुजाभाव, आकस, असे वर्तन बोस ह्यांना मान्य नव्हते. ह्या कृतीचा निषेध करत त्यांनी पगार घेण्यास आदरपूर्वक नकार दिला. असे सलग तीन वर्षे बिनपगारी राहून ज्ञान देण्याचे कार्य, आपल्या संस्कृतीला शोभेल असे वर्तन निःस्पृहपणे केले. हा एक सर्वात मोठा प्रयोग होता. अन्यायाविरुद्ध पहिला लढा होता. जो महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या अगोदर सफल झाला, फक्त तो सर्वसामान्यांपर्यंत पोहचला नाही. आज आपण आपल्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि अमृत महोत्सव साजरा करतो आहोत तेव्हा हे लक्षात घेणे अगत्याचे ठरते. असाच एक किस्सा आठवला. बोस यांनी प्रथम असे सिद्ध केले, की विना तार संदेशवहन होऊ शकते. हे एक विलक्षण होते, यावर कोणाचाही विश्वास बसेना. भारतीय माणूस असे काही करू शकतो! अशक्य कोटीचे, मग सर्व पणास लावून हा प्रयोग अयशस्वी कसा होईल त्याचे प्रयत्न सुरू झाले.


बोस यांनी प्रयोग दाखवण्यासाठी एक सभा आयोजित केली. त्यामध्ये प्राध्यापक व नामांकित व्यक्ती हजर होत्या. प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बोस यांची कीर्ती सर्वत्र पसरली. जनमानसात चर्चा होऊ लागली. त्यांची प्रयोग नोंदवही चोरीला गेली. हा घटनाक्रम साधारण सन १८९५ चा. बोस यांना जगभरातून बोलावणे येऊ लागले आणि जगप्रसिद्ध संस्था म्हणजे 'रॉयल सोसायटी ऑफ लंडन' येथे प्रयोग दाखवण्यासाठी बोलावले गेले. अत्यंत नम्रतेने बोस ह्यांनी ते स्वीकारले. प्रयोगाच्या दिवशी सभागृहात सारेच उपस्थित, सर्वत्र एकच चर्चा विना तार संदेशवहन कसे ?


या सभेला लंडनमधील प्रतिष्ठित लोक, संशोधक विचारवंत, हजर होते आणि अति महत्त्वाचे म्हणजे यात खुद्द मार्कोनीसुद्धा उपस्थित होते. पुढे अशाच प्रयोगाचे जनक म्हणून मार्कोनी यांना प्रसिद्धी मिळाली. काय हा विलक्षण योगायोग ? विनातारीचे उपकरण तयार करीत असताना अनेक साधनांची निर्मिती बोस यांनी केली, त्यांनी जर पेटंट आपल्या नावे केली असती तर ते फार पैसा कमावू शकले असते; पण अगदी निरलसपणे मानवतेचे कल्याण होण्यासाठीचे उपकरण म्हणून प्रयोग व साधने खुली करून दिली. क्रेस्कॉग्राफची निर्मिती, वनस्पतींनासुद्धा मनुष्याप्रमाणे भावना असतात हा यशस्वी प्रयोग तोही परकीय भूमीत हे सर्व अभूतपूर्व झाले. तरीसुद्धा त्यांना कधीही अहंकाराचा लवलेश स्पर्श करू शकला नाही, ही एक युवकांसाठी प्रेरणा होती. मार्गदर्शन होते. भारताने वैज्ञानिक जगतात खंबीर पाउल टाकण्याचे धाडस ठरले. असे प्रयत्न फक्त स्वातंत्र्याकरिता लागले असते; पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भरारी घेण्याकरिता अद्यावत राहण्याकरिता हा एक प्रकारचा इंग्रज सत्तेविरुद्ध लढाच होता फक्त दिव्या गतीचा होता.... 

धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा