भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा
जन्म. १३ जानेवारी १९४९ पतियाळा येथे.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण सेंट जॉर्जस् ग्रामर स्कूल, हैदराबाद येथे झाले. १९६६ मध्ये त्यांची राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी; NDA) या संस्थेमधील वायुसेना विभागात विद्यार्थी म्हणून निवड झाली.शिक्षण पुर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांची १९७० मध्ये भारतीय वायुसेनेत वैमानिक म्हणून नेमणूक झाली. शर्मा यांची वायुसेनेत चाचणी वैमानिक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या विमान उडवण्याच्या आवडीने व कौशल्याने त्यांना संधी प्राप्त झाल्या. त्यांनी पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात भाग घेतला होता (१९७१-७२). १९७१ नंतर त्यांनी विविध मिकोयान – गुरेविश (रशियन जेट) विमाने उडविली. अनेक टप्पे पार करून राकेश शर्मा भारतीय वायुसेनेत १९८४ साली स्क्वाड्रन लिडर या पदावर पोहोचले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था आणि सोव्हिएट रशियाच्या इंटरकॉसमॉस या सयुक्त प्रकल्पात (यामध्ये फ्रान्स व सिरिया या देशांचाही सहभाग होता.) २० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली. त्यांना विशेष मोहिमेवर जाण्याची संधी चालून आली. ३ एप्रिल १९८४ मध्ये सोयूझ T- ११ या अवकाशयानाने उड्डाण केले आणि त्याद्वारे राकेश शर्मा यांना अवकाशात जाणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत सोव्हिएट रशियाचे युरी व्हॅसिलेव्ह्यिच माल्येहेव जेन्नाडी मिखाईलोव्ह्यिच व स्टेकालोव्ह हे दोन अंतराळवीर देखील होते. अवकाशस्थानक सॉल्युत-७ मध्ये त्यांनी ८ दिवस पृथ्वीभोवती परिभ्रमण केले. त्यांचे मुख्य काम जैवऔषधे व दूरस्थ नियंत्रण प्रणाली (रिमोट सेन्सिंग सिस्टिम) यांत होते, शिवाय त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये भारताच्या उत्तर भागातील हिमालय पर्वताला लागून जलविद्युत् प्रकल्प उभारण्याकरिता जागा निश्चित करण्यासाठी विविध प्रतिमा घेणे, हे देखील होते. त्यांनी जीव विज्ञानीय आणि द्रव्य संस्करणाचे प्रयोग केले. त्यांमध्ये सिलिसियम वितळण्याची चाचणीदेखील होती. त्यांनी यानात (अवकाशातील दीर्घ प्रवासात होणाऱ्या शारीरिक व मानसिक परिणामांशी जुळवून घेता यावे म्हणून) योग व प्राणायम केल्याचेही नमूद केले होते. अवकाशात असताना त्यांचा तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी झालेला संवाद प्रसिद्ध आहे. इंदिरा गांधीनी त्यांना विचारले होते, ‘आकाशातून भारत कसा दिसतो?’ त्यावर राकेश उत्तरले, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा.त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. मोहिमेवरून परत येत असताना, पृथ्वीच्या वातावरणात शिरताच अवकाश यान पेटले. वातावरणातील घनता जशी वाढत गेली तसे बाह्यपृष्ठाचे घर्षण वाढत गेले व अवकाशयानाने अधिकच पेट घेतला. तेव्हा शर्मा यांनी सहकाऱ्यांसह हवाई छत्रीचा (पॅराशूटचा) वापर करून यानाबाहेर उडी मारली. ते कझाकस्तानच्या वाळवंटी भागात उतरले. राकेश शर्मा भारतीय सैन्यातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाल्यानंतर हिदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथे चाचणी वैमानिक म्हणून काम पाहू लागले. १९९२ पर्यंत हाल मध्ये काम केल्यानंतर ते बंगळूर येथील नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटर (NFTC)येथे हलक्या युद्धविमानाच्या प्रकल्पात सहभागी झाले. २००१ मध्ये ते चाचणी वैमानिक म्हणून पूर्णपणे निवृत्त झाले.ते ऑटोमेटेड वर्कफ्लो संस्थेचे प्रमुख होते. भारतीय अंतरिक्ष संशोधन २००६ मध्ये आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट केले वैज्ञानिकांच्या परिषदेत शर्मा यांना निमंत्रित होते
राकेश शर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. त्यात हिरो ऑफ सोव्हिएट युनियन व अशोक चक्र सन्मानाचा समावेश आहे.
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा