विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

नरेंद्र दाभोलकर

 



!! डॉ.नरेंद्र दाभोलकर जन्मदिन !!

     (१ नोव्हेंबर )

नरेंद्र अच्युत दाभोळकर  जन्म :१नोव्हेंबर  १९४५  मृत्यू:२० ऑगस्ट २०१३ हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र  १९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली.

        वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोलकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. दाभोलकरानी शैला यांच्याबरोबर विवाह केला. त्याना मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहेत. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले. लग्न सोहळा व त्यामधील खर्च यावर ते सतत टीका करीत. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले.

     सामाजिक कार्य: बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या  १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर  १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर १९९८ पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

         अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर  कित्येक वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

 दाभोलकर यांना मिळालेले पुरस्कार

*अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिला होता.

*समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्‍लब

*दादासाहेब साखवळकर पुरस्कार

*शिवछत्रपती पुरस्कार - कबड्डी

*शिवछत्रपती युवा पुरस्कार - कबड्डी

*पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव

   पुरस्कार (मरणोत्तेर)

७)भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार

   (मरणोत्तर)

   डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

   🙏🙏🙏🙏

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق