सर फिरोजशाह मेहता
इंडियन नॅशनल काँग्रेसचे एक संस्थापक. नामांकित वकील, उत्तम प्रशासक आणि प्रखर राष्ट्रवादी मुंबई महापालिकेचे जनक व भारतीय सर फिरोजशाह मेहता यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मुंबई येथे झाला.
पारशी लोकांत मोठमोठे दानशूर व्यक्ती या समाजात होऊन गेल्या. त्यापैकी एक म्हणजे सर फिरोजशहा मेहता. ते एक नामांकित वकील, उत्तम प्रशासक आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांचे वडील मेरवजी मेहता यांचा कोलकात्याला व्यापार होता, पण व्यापारानिमित्त ते अधूनमधून मुंबईत राहात असत.
फिरोजशहा मेहता यांचे सर्व शिक्षण मुंबईत झाले. एलफिन्स्टन कॉलेज मधून एम.ए. होऊन ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात पितामह दादाभाई नौरोजी यांचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन १८६८ मध्ये हिंदुस्थानात आले व मुंबईत त्यांनी वकिली सुरू केली.
१८६९ मध्ये त्यांनी दादाभाई नौरोजींच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बॉम्बे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारी विरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. सुरतच्या आंदोलनातून उद्भवलेल्या दंगल केस मध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभे राहून फिरोजशहांनी कीर्ती मिळवली. अनेक महत्त्वाचे प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिलीबरोबर राष्ट्रीय जागृतीचेही कार्य केले.
१८७२ च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर त्यांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले. १८७३ मध्ये ते महानगरपालिकेचे आयुक्त झाले. १८७८ ते १८८० या काळात वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हरनॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी यासाठी आयात करातून देण्यात आलेली सूट या दोन प्रश्नां वर त्यांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला.
इल्बर्ट बिलाला पाठिंबा देण्यासाठी फिरोझशहा आदी राष्ट्रवाद्यांनी गोऱ्यांविरुद्ध प्रतिआंदोलन उभारले.
१८८४-१८८५ या काळात ते मुंबई महानगरपालिकेचे महापौर होते. बॉम्बे असोसिएशनचे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये रूपांतर झाले. त्यावेळी या संस्थेचे ते स्वत: न्यायमूर्ती तेलंग व दिनशा एडलजी वाच्छा हे पहिले सरचिटणीस झाले. याचवर्षी मुंबईत भरलेल्या पहिल्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी व त्यांच्या सहकार्यानी हिरिरीने भाग घेतला. त्यांची राष्ट्रीय नेत्या मध्ये तेव्हापासून गणना होऊ लागली.
जनमत तयार करण्यासाठी त्यांनी ‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे वृत्तपत्रही सुरू केले. परदेशी राजवट हिंदुस्थानची कशी लूट करते यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. त्यांच्या कारकीर्दीत मुंबई शहरात अनेक सुधारणा होऊन या महानगरीचा कायापालट झाला. ते महापालिकेच्या कारभारात इतके लक्ष घालीत की, महापालिका म्हणजे फिरोजशहा मेहता व फिरोजशहा मेहता म्हणजे महापालिका अशी म्हण पडली होती. ते राजकारणात नेमस्त असले तरी अत्यंत मानी व निर्भय होते.
लॉर्ड कर्झन वायली हे हिंदुस्थानचे व्हॉईसराय होते तेव्हाची गोष्ट. कर्झन हे मुंबईला आले असता त्यांच्या सन्मानार्थ अनेक जाहीर मेजवान्या दिल्या गेल्या, पण फिरोजशहा मेहता एकाही जाहीर मेजवानीला हजर राहिले नाहीत. फक्त त्यांच्या एका मित्राने लॉर्ड कर्झन यांना खासगी मेजवानी दिली. त्यावेळी शिष्टाचार म्हणून ते मेजवानीला हजर होते, पण लॉर्ड कर्झन यांच्या शेजारीच त्यांची खुर्ची असून त्यांनी व्हॉईसरायकडे पाहिले नाही. तेव्हा व्हॉईसरॉय फिरोजशहांच्या वर्तनामुळे गोंधळून गेले. ते फिरोजशहा जवळ गेले व त्यांना म्हणाले, ‘तुमचा माझ्यावर इतका राग का?’ यावर फिरोजशहा म्हणाले, ‘आपण ऑक्स्फर्ड विद्यापीठातील जुने दोस्त. तुम्ही व्हॉईसरॉय म्हणून आलात त्यावेळी मी तुमचा मान राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तुम्ही उर्मट बनलात. तुम्ही माझी पर्वा केली नाही. माझ्यातही पाणी आहे हे आपण विसरू नये.’ यावर लॉर्ड कर्झन यांनी फिरोजशहांची क्षमा मागितली.
१८९० मध्ये कॉंग्रेसच्या ६ व्या अधिवेशनसाठी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. पुढे ते मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य झाले. शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी त्यांनी विविध उपाय सुचवले. तसेच शासकीय खर्चात कपात करावी यासाठी आग्रह धरला. विश्ववविद्यालये स्वायत्त असावीत, त्यावर शासकीय दडपण असू नये अशा मागण्या केल्या.
याशिवाय फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे येथून बॉम्बे क्रॉनिकल या इंग्रजी दैनिकाचे प्रकाशन सुरू केले, त्यांच्या दैनिक मासिकाद्वारे भारतीयांना त्यांच्या हक्कांसाठी अहिंसक मार्गाने लढण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या या पत्राचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते
१८९४ मध्ये इंग्रज सरकारने त्यांना सी.आय.ई. हा किताब दिला होता. १९११ मध्ये त्यांच्या पुढाकाराने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. १९१५ साली मुंबई विश्व विद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच वर्षी विद्यापीठाने त्यांना एलएलडी ही मानद पदवी दिली. फिरोजशहा मेहता यांचे ५ नोव्हेंबर १९१५ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा पूर्णाकृती पुतळा आजही मुंबई महापालिके समोर उभा आहे. शिवाय संसद भवनाच्या लॉबीतही त्यांचे तैलचित्र आहे.
स्वातंत्र्याचे महान नायक मानले जाणारे महात्मा गांधी यांच्या विचारांनी फिरोजशाह मेहता खूप प्रभावित होते. आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतिरेकी विचारसरणी हा सर्वात मोठा धोका मानला. त्यांनी आर्म्स ऍक्ट, प्रेस ऍक्ट, पशूबळी इत्यादींना कडाडून विरोध केला. आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. भारतीयांना सामाजिक आणि राजकीय विचारांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी शिक्षणाच्या प्रसारावर खूप भर दिला.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق