*स्वातंत्र्य सेनानी पुरुषोत्तम दास टंडन*
********************************
पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्मदिन
आहे १ ऑगस्ट १८८२ (प्रयागराज,उत्तरप्रदेश) तर
स्मृतीदिन १ जुलै १९६२ आहे
पुरुषोत्तम दास टंडन हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी होते. हिंदी भाषेला अधिकृत भाषा स्थान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांचा मोठ्या वाटा होता. १९६१ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे झाला.
माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असतानाच १८९९ साली ते काँग्रेसचे स्वयंसेवक म्हणून कार्य करू लागले. त्यांनी स्वातंत्र्यलढयात सक्रिय सहभाग घेतला. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी पहिल्यांदा बीए आणि नंतर एलएलबी ची पदवी संपादन केली. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून त्यांनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला. त्यांचे अनेक विषयांवरील लेखनही प्रसिद्ध आहे. हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लोक त्यांना ‘राजर्षी’ या नावाने ओळखत असत. त्यांच्या महान योगदानाबद्दल १९६१ साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق