* स्वांतत्र्यवीर खुदिराम बोस *
खुदिराम बोस यांचा११ ऑगस्ट १९०८ हा स्मृतीदिन आहे.
भारतातील तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात ३ डिसेंबर १८८९ ला झाला.
त्याच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि।वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यू झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.
वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात त्या वयात त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस बंगालची फाळणी झाल्यानंतर बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्येन बोस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांचं क्रांतिकारी जीवन सुरू केलं. नववीत असताना त्यांनी शाळा सोडली आणि त्यांचा पूर्ण वेळ देशासाठी दिला .
बॉम्ब स्फोटाच्या कटात सहभागी
२८ फेब्रुवारी १९०६साली सोनार बंगला नावाचं एक जाहिरात पत्रक वाटत असताना बोस यांना पोलिसांनी पकडले. दरम्यान बोस यांनी हुशारीनं त्यांना चकमा देत तिथून पळ काढला. त्यानंतर १६ मे १९०६ रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली पण अल्पवयीन असल्या कारणाने त्यांना समज देऊन त्यांना सोडण्यात. ६ डिसेंबर १९०७मध्ये बंगालमध्ये नारायणगड रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात बोस यांचा सहभाग होता .
किंग्सफोर्डच्या हत्येचा कट
किंग्सफोर्ड चीफ प्रेसिडेंसी मॅजिस्ट्रेट हे क्रुर अधिकारी म्हणून ओळखले जातं होते. फक्त क्रांतिकारकांना त्रास देणं हा त्यांच्या मुळं उद्देश होता. म्हणून क्रांतिकारकांनी त्यांची हत्या करण्याचा कट योजना आखली. युगांतर क्रांतिकारी दलाचे नेते वीरेंद्र कुमार यांनी किंग्सफोर्डच्या हत्येची कामगिरी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चंद यांच्याकडं सोपवली.
किंग्सफोर्डवर हल्ला
प्रफुल्ल चंद आणि खुदीराम बोस दोघं किंग्सफोर्डला मारण्यासाठी बिहारला रवाना झाले. बिहारला पोहचल्यानंतर आठ दिवस त्यांनी किंग्सफोर्ड आणि त्यांच्या कुटुंबावर पाळत ठेवली. ३० एप्रिल १९०८ साली रात्री साडे आठच्या दरम्यान किंग्सफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब हल्ला केला पण त्यांचा अंदाज चुकला आणि त्या हल्ल्यात किंग्सफर्डची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला .
हल्ल्यात किग्सफोर्डचा मृत्यू झाला असं समजून दोघांनीही तिथून पळ काढला आणि पूसा रेल्वे स्थानकात पोहचले. रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच त्यांना घेरण्यात आलं. आता आपल्याला अटक होणार हे जाणताच प्रफुल्ल चंद यांनी स्वतःवर गोळी झाडली तर खुदीराम बोस यांना पोलिसांनी अटक केली. बोस यांच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला. केवळ पाच दिवस चाललेल्या या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी ही त्यांचा गुन्हा कबुल करत फाशीची शिक्षा स्वीकारली. ११ ऑगस्ट १९०८ साली त्यांना फासावर चढवण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ पुसा रेल्वे स्थानकाचं नाव खुदीराम बोस करण्यात आलं .
मृत्यूनंतर लोकप्रियता वाढली
खुदीराम बोस यांच्या फाशीनंतर बंगालमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. बंगालमधील जुलाह भागात एक खास धोतर बनवण्यात आलं या धोतराच्या काठावर खुदीराम असं लिहिलं होतं.
इतर
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.
यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.
या घटनेच्या दुसर्या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११ ऑगस्ट १९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा