* गणेश हरी खरे *
जन्म - १० जानेवारी १९०१ (पनवेल,रायगड)
स्मृती - ५ जून १९८५
इतिहासकार ग. ह. खरे यांचा जन्म १० जानेवारी १९०१ रोजी झाला.
इतिहासकार ग. ह. खरे हे वि.का. राजवाड़े यांचे शिष्य, ज्यांनी अविवाहित राहून इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. खरे यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली.
सुटके नंतर त्यांनी इतिहास अभ्यास सुरु केला. त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केले. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. १९२९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे नोकरी, पण नंतर निधना पर्यंत, चिटणीस, कार्याध्यक्ष या नात्यानी संस्थेची भरीव सेवा त्यांनी केली.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق