अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा
जन्म - १ ऑगस्ट १८७९ (वाई) रोजीचा
अर्वाचीन मराठीतील ललित, सुलभ लेखनशैलीचे आद्यप्रवर्तक व वृत्तपत्रकार म्हणून ते ओळखले जातात.
सुरुवातीस ‘शुभसूचक’ म्हणून लिहिणाऱ्या अच्युतरावांनी *देशसेवक, संदेश, स्वातंत्र्य, राष्ट्रमत* अशी दैनिके, तर युगांतर, चाबूक, ‘लंरणसंग्राम या सारखी साप्ताहिके चालविली. स्वामी विवेकानंद (आवृ. दुसरी, १९१६), नारिंगी निशाण (१९१७) व संगीत मस्तानी (१९२६) यांसारखी नाटकेही त्यांनी लिहिली. स्वत:ची नाटक कंपनी काढून काही नाटकांतून भूमिका केल्या. काही कादंबऱ्या लिहिल्या, तथापि ‘संदेशकार’ हीच त्यांची जनमानसात विशेष रूढ झालेली प्रतिमा होती.
टिळकांवरील मृत्युलेख, मराठी काव्याची प्रभात, शेवटची वेल सुकली, दोन तात्या, पुणेरी जोडे, माधवाश्रमात शिवाजी ह्यांसारखे त्यांचे वेचक लेख वृत्तपत्रीय मराठी साहित्याची भूषणे होत. श्रुतिबोध, उषा ही मासिके काढली. विवेकानंद, ताई तेलीण ही नाटके लिहिली. लोकमान्यांच्या समाधीपुढे, इंग्रजांचा पराभव, चोरून चुंबन या त्यांच्या कादंबऱ्या.
*वाङ्मयाचे सर्व प्रकार लीलया हाताळणारे अच्युतराव स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारक होते. १९०७ नंतर त्यांना अडीच वर्षाचा कारावासही भोगावा लागला होता. आपली मते आपल्या आकर्षक आणि सुबोध शैलीत बहुजनांच्या अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे कार्य मौलिक होते*. आपल्या ललितरम्य लिखाणाला ते उपरोध, उपहास व विरोधी शैलीची जोड देत.
अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे १५ जून १९३१ रोजी निधन झाले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق