*जरा याद करो कुर्बानी*
*क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी *
********************************
क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी यांचा
जन्म २३ मार्च १९२४ (सक्कर) रोजी झाला. तर
स्मृतीदिन आहे - २१ जानेवारी १९४५ (सक्कर) !
हेमू कलाणी यांचा जन्म कलानी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण टिळक हायस्कूल मधून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दीक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत तरुणांनी स्वराज्य सेना सक्कर मध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलाणींकडे होते.
आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. २३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेप्रमाणे हेमू व त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाच्या फिश प्लेट्स काढण्याच्या कामास सुरुवात केली. एवढ्यात संरक्षण पथकाचे शिपाई तेथे आले. हेमू कलाणींनी सर्व सहकाऱ्यांना पळण्यास सांगितले. कोणीही पळण्यास तयार नव्हते. तरी हेमू कलाणींनी त्यांना दरडावून पळवून लावले. पण हेमू एकटेच शिपायांच्या हाती सापडले.
लष्करी कोर्टापुढे त्यांना आणण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या सहकार्यांची नावे सांगितली नाहीत. हेमू कलाणींनी कोर्टाच्या कामात सहभागी होण्याचे नाकारले. बचावासाठी वकीलही दिला नाही. त्यांनी लष्करी कोर्टाला एकच उत्तर दिले, "गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले त्याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची सैनिक गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे."
लष्करी कोर्टाने हेमू कलाणींना आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली. पण लष्करी कमांडर लॉर्ड रिचर्डसन याने ती बदलून हेमू कलाणींना फाशी देण्याचे फर्मान काढले. हेमू कलाणींना वाचविण्यासाठी अनेकांनी व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो पर्यंत प्रयत्न केले. परंतु काही उपयोग झाला नाही.
फाशीपूर्वी वैद्यकीय तपासणीत त्यांचे वजन आठ पौंड वाढल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. "ब्रिटिश साम्राज्य नष्ट होवो" अशा घोषणा देत हेमू कलाणी २१ जानेवारी १९४५ रोजी सक्कर येथे वधस्तंभावर चढून गेले.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संकलन
राजेंद्र गुरव,यमाई औंध
९५६११५
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق